उपघटक - त्रिज्या, व्यास, जीवा, केंद्र, परीघ, आंतरभाग, बाह्यभाग, वर्तुळकंस त्रिज्या - वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू यांना जोडणारी रेषा म्हणजे त्रिज्या होय. एका वर्तुळाला अनेक त्रिज्या असतात.
जीवा - वर्तळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा म्हणजे जीवा होय.
व्यास - वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला वर्तुळाचा व्यास म्हणतात. व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते.
वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट लांबीचा असतो.
वर्तुळाचा आंतरभाग - वर्तुळाच्या आत असलेल्या भागाला वर्तुळाचा आंतरभाग म्हणतात.
वर्तुळाचा बाह्यभाग -वर्तुळाच्या बाहेर असेलल्या भागाला वर्तुळाचा बाह्यभाग म्हणतात.
वर्तुळाचा परीघ - वर्तुळाच्या वर्तुळाकार लांबीला परीघ म्हणतात. वर्तुळ कंस - वर्तुळ परीघाच्या लहान मोठ्या भागांना वर्तुळकंस म्हणतात.
वर्तुळ कंसाला तीन अक्षरी नाव देतात
0 Comments