Chandrayaan-3 चांद्रयान
चांद्रयान 3 हे दिनांक 14 जुलै, 2023 रोजी लाँच होणार आहे. म्हणजेच शुक्रवारी ठीक 2:35 PM ला श्रीहरिकोटा येथून Chandrayaan-3 Launch केले जाणार आहे. मागील चंद्रयान मोहिमेत अगदी शेवटच्या क्षणी संपर्क तुटल्यामुळे चंद्रयान 2 मोहिम अपयशी ठरली होती.
तेव्हा खुद्द आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. तेव्हा त्यांनी आपल्या शास्त्रज्ञांना दिलेला दिलासा हा खूप Emotional होता. पण आता अखेर या नव्या चंद्रयान मोहिमे द्वारे त्या अपयशाला यशात बदलण्याचा हा शास्त्रज्ञांचा मनसुबा आहे. आणि त्यासाठी मागील काही दिवसांपासून आपले ISRO चे शास्त्रज्ञ दिवस रात्र मेहनत घेत आहेत.
14 जुलैला जेव्हा चंद्रयान 3 चे प्रक्षेपण यशस्वी होईल, तेव्हा केवळ ही सर्व भारतीयांसाठी आनंदाची बातमी नसणार. नाहीतर ही एक स्वाभिमानाची बातमी असणार. कारण हाच ती क्षण आहे ज्यासाठी आपण दशकांपासून वाट पाहतोय.
त्यामुळे या ऐतहासिक क्षणाचे आपण साक्षीदार होणार हे आपले भाग्यच आहे. कारण याच वेळी भारत पहिल्यांदा चंद्रावर आपले पाऊल टाकणार आहे. आणि त्या चार देशांच्या रांगेत जाणार आहे ज्यांनी चंद्रावर यापूर्वीच सुरक्षित लँडिंग केली आहे.
ISRO संस्थेचा महत्वाकांक्षी असा हा प्रोजेक्ट आता 14 तारखेला अवकाशात झेपणार आहे. चंद्रयान 3 मोहिम ही चंद्रयान 2 प्रमाणेच आहे, परंतु यात Soft Landing केली जाणार की नाही याची माहिती मिळालेली नाही. एक गोष्ट Clear आहे, हे चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणार आहे.
आंध्रप्रदेश मधील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरुन या यानचं लॉन्चिंग केलं जाणार आहे. 14 जुलैला दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी चंद्रयान-3 चं प्रक्षेपण होणार आहे, अशी माहिती इस्त्रोने ट्विटरवर दिली आहे. या मोहिमे अंतर्गत चंद्राच्या पृष्ठभागावर एक लँडर उतरवण्यात येणार. या लँडरला एक रोवर आहे.
हा रोवर चंद्राच्या जमिनीवर फिरेल, आणि तिथे काही प्रयोग करेल. हे लँडर चंद्रावर एक लूनार दिवसपर्यंत राहील. एक लूनार दिवस म्हणजे पृथ्वीवरचे 14 दिवस असतात. चांद्रयान-3 च्या लँडरसाठी सूर्यप्रकाश असणं जरुरीचा आहे. चंद्रावर 14-15 दिवस सूर्य उगवतो, तर पुढचे 14-15 दिवस सूर्य उगवत नाही. त्यामुळे फक्त 14 दिवसांची ही महत्वाची अशी चंद्रयान-3 मोहिम आहे.
अधिक माहिती नुसार ISRO चे प्रमुख एस सोमनाथ यांनी Landing केव्हा होणार? याची माहिती सांगितली आहे. चांद्रयान-3 हे यान 23 आणि 24 ऑगस्टला चंद्राच्या पृष्ठभागावर किंवा परिघात लँडिंग करण्याचा प्रयत्न करेल, अशी अधिकृत महिती एस सोमनाथ यांनी दिली आहे.
चंद्रयान-3 मोहिमेसाठी एकूण खर्च हा 651 कोटी रुपये इतका आहे, आणि मोहिमेसाठी शासनाने 651 कोटी रुपये बजेट दिले आहे.
जगातील एकूण इतर 3 देशांनी आतापर्यंत चांद्रयान मोहिम सफलता पूर्वक पूर्ण केली आहे. त्यात अमेरिका, चीन, रशिया आणि आता 14 तारखे नंतर या लिस्ट मधे आपला भारत पण येणार आहे.
भारत माता की जय
आज दुपारी ठीक २:३५ वाजता थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी लिंक :* https://www.youtube.com/live/q2ueCg9bvvQ?feature=share
0 Comments