Ticker

10/recent/ticker-posts

विशेष गरजा असणारे विद्यार्थी व त्यांच्यासाठीच्या शासन योजना | Divyang Vidyarthi | केंद्रप्रमुख परीक्षा

 विशेष गरजा असणारे विद्यार्थी व त्यांच्यासाठीच्या शासन योजना | Divyang Vidyarthi | केंद्रप्रमुख परीक्षा

Divyang Vidyarthi



 विशेष गरजा असणारे विद्यार्थी व त्यांच्यासाठीच्या शासन योजना

केंद्रप्रमुख परीक्षा 2023

 

दिव्यांग या शब्दाचा प्रयोग कोणत्या वर्षापासून केला जात आहे ?

  1. 2010
  2. 2015
  3. 2023
  4. 2020

Correct answer

2015

 

भारतात समावेशक शिक्षणाचा विकास कोणत्या टप्प्यातून झाला आहे ?

  1. विशेष शिक्षण

  2. एकात्मिक शिक्षण

  3. समावेशक शिक्षण

  4. वरील सर्व

Correct answer

वरील सर्व

 

प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रीकरणाची सर्व शिक्षा अभियान या नावाने ओळखली जाणारी योजना भारतात कधीपासून राबवली जात आहे?

  1. 2001

  2. 2011

  3. 2000

  4. 2010

Correct answer

2001

 

A)घटनेच्या भाग 4 मधील कलम 41 हे दिव्यांग व्यक्ती बाबत महत्त्वाचे आहे.

B)या कलमानुसार राजसंस्थे त कामाचा हक्क शिक्षणाचा हक्क आणि दिव्यांग व्यक्तीच्या बाबतीत लोक सहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत अधिकार आहे.


  1. फक्त विधान A बरोबर आहे

  2. फक्त विधान B बरोबर आहे

  3. दोन्ही विधाने बरोबर आहे.

  4. दोन्ही विधाने चूक आहेत.

 

Correct answer

दोन्ही विधाने बरोबर आहे.

 

भारतीय पुनर्वसन परिषद अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे?

  1. 1991

  2. 1992

  3. 1993

  4. 1994

Correct answer

1992

 

A)भारतीय पुनर्वसन परिषद अधिनियम या कायद्यानुसार दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणासाठी भारतीय पुनर्वसन परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. B) ही परिषद दिव्यांग व्यक्तीच्या शिक्षण आणि प्रशिक्षणाची प्रमाणके तयार करते.

  1. फक्त विधान A बरोबर आहे

  2. फक्त विधान B बरोबर आहे

  3. दोन्ही विधाने बरोबर आहेत.

  4. दोन्ही विधाने चूक आहेत.

Correct answer

दोन्ही विधाने बरोबर आहेत.

 

दिव्यांग व्यक्तींना समान संधी आणि त्यांच्या अधिकारांचे संरक्षण व राष्ट्र उभारणी मुद्द्यांचा संपूर्ण सहभाग याचा अंतर्भाव असणारा अधिनियम कोणत्या वर्षीचा आहे ?

  1. 1996

  2. 1992

  3. 2000

  4. 1995

Correct answer

1995

 

योग्य विधान निवडा.

विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत विद्यापीठांमध्ये दिव्यांगासाठी समान संधी कक्ष स्थापन करण्यात आला आहे

 

  1. विद्यापीठ स्तरावर दिव्यांग यांच्या योजना आणि उपक्रम यांच्या प्रभावी अंमलबजावणीवर या कक्षा द्वारे विशेष लक्ष ठेवले जाते.

  2. विद्यापीठ अनुदान आयोगामार्फत दरवर्षी या सेल्सना दोन लाख रुपये वार्षिक अनुदान मिळते.

  3. वरील सर्व विधाने बरोबर आहेत.

Correct answer

वरील सर्व विधाने बरोबर आहेत.

 

 योग्य विधान निवडा 

  1. दिव्यांग विद्यार्थ्यासाठी राष्ट्रीय फेलोशिप शिष्यवृत्ती ही योजना 2012-13 पासून सुरू करण्यात आली.

  2. ही योजना एम. फील. व पी एच. डी. कोर्सेससाठी आहे

  3. यात दरवर्षी 200 शिष्यवृत्ती दिल्या जातात.

  4. सर्व विधाने बरोबर आहेत

Correct answer

सर्व विधाने बरोबर आहेत

 

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना या संदर्भात चुकीचे विधान निवडा.

  1. या शिष्यवृत्तीत 6 जागा महिलांसाठी राखीव असतात.

  2. ही शिष्यवृत्ती 100 दिव्यांग विद्यार्थ्यांना दिली जाते.

  3. या योजनेची सुरुवात 2014 -15 पासून झाली आहे

  4. ही शिष्यवृत्ती परदेशात पी. एच. डी. किंवा मास्टर डिग्री करण्यासाठी दिली जाते.

Correct answer

ही शिष्यवृत्ती 100 दिव्यांग विद्यार्थ्यांना दिली जाते.

 

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शिक्षण योजना 

याविषयी योग्य विधान निवडा

  1. ही योजना 2009-10 मध्ये सुरू झाली.

  2. या योजनेअंतर्गत नवी ते बारावीच्या वर्गात शिकत असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्व समावेशक शिक्षणासाठी मदत केली जाते.

  3. ही शिष्यवृत्ती योजना 100% केंद्र पुरस्कृत आहे.

  4. वरील सर्व

Correct answer

वरील सर्व

 

IEDSS म्हणजे काय आहे?

  1. Inclusive education for disabled at secondary state.

  2. Inclusive education for disabled at secondary students

  3. Intensive education for disabled at secondary state.

  4. None of these

 

Correct answer

Inclusive education for disabled at secondary state.

 

विकलांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार यासंदर्भात योग्य विधान निवडा

  1. 3 डिसेंबर या आंतरराष्ट्रीय विकलांग व्यक्ती दिवशी हा पुरस्कार

  2. 1969 मध्ये हा राष्ट्रीय पुरस्कार सुरू झाला.

  3. वरील सर्व विधाने बरोबर आहेत.

  4. या पुरस्कारास National award for empowerment of PWDs असे नाव आहे.

Correct answer

वरील सर्व विधाने बरोबर आहेत.

 

शासकीय संस्थांमधून दिव्यांगाचे शिक्षण आणि प्रशिक्षण (यासंदर्भात योग्य विधान निवडा)

  1. हे प्रशिक्षण महाराष्ट्र शासनातर्फे राबवले जाते

  2. या योजनेमधून सहा ते अठरा वयोगटातील दिव्यांग विद्यार्थ्यांना सोयी सुविधा पुरवण्यात येतात.

  3. या योजनेअंतर्गत अठरा वर्षावरील दिव्यांग विद्यार्थ्यांना शासकीय कार्यशाळा मधून निरनिराळ्या व्यवसायाचे दिव्यांगत्वानुसार व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते.

  4. वरील सर्व

Correct answer

वरील सर्व

 

प्रतिभाशाली बालकाची बुद्धिमत्ता किती असते?

  1. 140 च्या वरती

  2. 100 पेक्षा कमी

  3. 70 पेक्षा कमी

  4. यापैकी नाही

Correct answer

140 च्या वरती

 

ज्या बालकाचा बुद्धांक 70 पेक्षा कमी असतो त्यांना ---------- बालके असे म्हणतात.

  1. मतिमंद बालके

  2. प्रतिभाशाली बालके


Correct answer

मतिमंद बालके

 

Dislexia डिसलेक्सिया हा कोणता दोष आहे

  1. वाचनात दोष

  2. लेखनात दोष

  3. गणिती दोष

 

Correct answer

वाचनात दोष

 

डिसकॅलक्यूलिया हा कोणता दोष आहे?

  1. लेखनात दोष

  2. वाचनात दोष

  3. गणिती दोष

Correct answer

गणिती दोष

 

डिसग्राफिया हा कोणता दोष आहे?

  1. लेखनात दोष

  2. गणिती दोष

  3. वाचनात दोष

Correct answer

लेखनात दोष

 

 दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने मिळतात यासाठी लाभार्थ्याचे दिव्यांगत्व किमान किती टक्के असावे ?

  1. 30%

  2. 10%

  3. 40%

  4. 20%

Correct answer

40%


  1. मागील अभ्यास पाहण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.

Post a Comment

0 Comments

Total Pageviews