Ticker

10/recent/ticker-posts

School Uniform | महाराष्ट्र शाळा गणवेश

 School Uniform | महाराष्ट्र शाळा गणवेश


Maharashtra school uniform



समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत मोफत गणवेश

योजनेच्या अंमलबजावणीबाबत......

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन निर्णय क्रमांक: एसएसए-१२२०/प्र.क्र.१५४/एस.डी.३मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२ दिनांक: ०८ जून, २०२३

वाचा:-

१) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग क्र. एसएसए-२०१६/प्र.क्र.१११/एस.डी.-३/ दि.२१/०७/२०१६.

२) केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शक सूचना

प्रस्तावना:-

केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ.१ ली ते इ.८ वी मधील शिक्षण घेत असलेल्या सर्व मुली, अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील मुले तसेच दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यात येतो. तसेच, सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून प्रस्तुत योजनेचा लाभ दारिद्र्यरेपेवरील पालकांच्या मुलांनादेखील देण्यात येणार आहे. सदर योजनेंतर्गत एका गणवेशाकरीता रु.३००/-याप्रमाणे प्रति विद्यार्थी दोन गणवेशाचा लाभ देण्यात येतो. प्रस्तुत योजनेचा निधी संबंधित शाळा व्यवस्थापन समितीस शासनामार्फत उपलब्ध करुन दिला जातो. त्यानुसार शाळा व्यवस्थापन समितीमार्फत स्थानिक स्तरावर गणवेश विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिले जातात.

स्काऊट व गाईड शिक्षणाची संस्कार क्षमता विचारात घेवून राज्यातील शाळांमध्ये स्काऊट शिक्षणाचा समावेश करण्यात येणार आहे. सदर स्काऊट व गाईड विपयाच्या शिक्षणासाठी वेगळा गणवेश निर्धारित करण्यात आलेला आहे. त्यानुसार आवश्यक असणारा वेगळा गणवेश सद्यस्थितीत विद्यार्थ्यांच्याकडे उपलब्ध नाही. त्यामुळे प्रस्तुत शाळांमधील विद्यार्थ्यांना स्काउट व गाईड या विषयास अनुरुप असणारा गणवेश उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यामुळे मोफत गणवेश योजनेंतर्गत संपूर्ण राज्यातील पात्र विद्यार्थ्यांना स्काऊट व गाईड विपयास अनुरुप एक समान एक रंगाचा दर्जेदार गणवेश उपलब्ध करुन देण्याकरीता योजनेच्या अंमलबजावणीमध्ये बदल करण्याची बाब शासनाच्या

विचाराधीन होती.


१)सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इ. १ ली ते इ.८ वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेचा लाभ देण्यासाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

i. प्रस्तुत योजनेंतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षामध्ये पात्र विद्यार्थ्यांना दोन गणवेशाचा लाभ शाळा व्यवस्थापन समितीमार्फत देण्यात यावा. यासाठी केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या दराप्रमाणे निधी राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांनी वितरीत करावा.

ii. मोफत गणवेश योजनेंतर्गत अनेक शाळांनी व कापड उद्योजकांनी विभागाच्या पूर्व परवानगीशिवाय सन २०२३-२४ या वर्षासाठीचे गणवेश तयार करण्याचे काम केले आहे.

सदर तयार गणवेशामुळे संबंधिताचे आर्थिक नुकसान होवू नये म्हणून शासनाने शाळा व्यवस्थापन समितीस उपलब्ध करुन दिलेल्या निधीमधून सन २०२३-२४ या शैक्षणिक

वर्षासाठी एक गणवेश शाळा व्यवस्थापन समितीने निश्चित केल्यानुसार विद्यार्थ्याना उपलब्ध करुन देण्यात यावा.

iii. विद्यार्थ्यांना उर्वरित एक गणवेश स्काऊट व गाईड विपयास अनुरुप (मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पँट/पँट तसेच, मुलींना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा ज्या शाळांमध्ये सलवार कमीज असेल तर सलवार गडद निळ्या रंगाची व कमीज आकाशी रंगाची) शाळा व्यवस्थापन

समितीमार्फत देण्यात यावा. प्रस्तुत गणवेशाबाबतची सर्वसाधारण रचना सोबत परिशिष्ट अ मध्ये जोडली आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या शर्टवरती शोल्डर स्ट्रिप (Shoulder Stripe) व दोन खिसे (Double Pocket) असणे आवश्यक आहे.

iv. स्काऊट व गाईड विपयासाठी आवश्यक असणाऱ्या गणवेशामधील टोपी व स्कार्फ याबाबत वेगळयाने आदेश निर्गमित करण्यात येतील.

v. स्काऊट व गाईडच्या गणवेशावावत आवश्यक ती सर्व माहिती महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने सर्व संबंधितांना उपलब्ध करुन देण्यात यावी.

vi. स्काऊट व गाईड या विपयाच्या तासिका आठवडयातून दोन दिवस असतात. त्यापैकी एक तासिका शक्यतो शनिवारी असते. त्यामुळे मंगळवार, गुरुवार व शनिवार या तीन दिवशी स्काऊट व गाईड विपयास अनुरूप उपलब्ध करुन देण्यात येणारा गणवेश विद्यार्थ्यांनी परिधान करणे आवश्यक राहील. तसेच, उर्वरित सोमवार, बुधवार व शुक्रवार या तीन दिवशी शाळा व्यवस्थापन समितीने निश्चित केलेल्या रंगाचा गणवेश परिधान करण्यात यावा.

पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच सन २०२४-२५ पासून शासनाच्या वतीने सर्व शाळांमध्ये स्थानिक महिला बचत गटांमार्फत शिलाई करुन एक समान एक रंगाचे दोन गणवेश

उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये मोफत गणवेश योजनेबाबत स्थानिक स्तरावर कोणतीही कार्यवाही करु नये. याबाबतच्या आवश्यक त्या सविस्तर सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील.

प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३०६०८१४४८१३१६२१ असा आहे. हा आदेश

डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


अवर सचिव, महाराष्ट्र शासन

Post a Comment

0 Comments

Total Pageviews