बँका म्हणजे अशी ठिकाणे की जिथे लोक आपले पैसे ठेवू शकतात. बरेचसे लोक आपल्या बचत खात्यांत पैशांची बचत करण्यासाठी आणि चेक खात्यांतून पैसे देण्यासाठी बँकांचा उपयोग करतात आजकाल, जेव्हा लोकांना कामांचे पैस मिळतात. तेव्हा त्यांच्या पगाराचे चेक बऱ्याचदा त्यांच्या बचत खात्यांत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जमा होतात. त्यानंतर ते आपली बिले आपल्या खात्यांमधून चेक लिहून भरू शकतात किंवा जेथे त्यांची बिले त्यांच्या बँक खात्यांशी इलेक्ट्रॉनिक तऱ्हेने जोडलेली असतात तेथे ऑनलाईन भरू
शकतात.बँका लोकांना कर्जेही देतात. बँकाच्या खातेदारांनी जमा केलेले पैसे बँका लोकांना नवीन घरे खरेदी करण्यसाठी, कार घेण्यासाठी अथवा उद्योगधंदे सुरू करण्यासाठी कर्जाऊ देतात. अशा तऱ्हेने कर्जावर व्याज आकारून बँका पैसे कमावतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचे
म्हणजे, लोकांनी जितके पैसे कर्जाऊ घेतलेले असतात. त्यापेक्षा त्यांना परत करावे लागतात. बँकाला एखादा कर्जदार कितपत धोकादायक वाटतो आणि कर्जाची परतफेड किती वेगाने केली जाते या आणि इतर गोष्टींवर ही रक्कम अलवंबून असते.
0 Comments