Ticker

10/recent/ticker-posts

महिला शिक्षण दिन | Mahila Shikshan Din | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले

 महिला शिक्षण दिन | Mahila Shikshan Din 





क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती “महिला शिक्षण
दिन” म्हणून साजरी करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

प्रस्तावना :
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा ३ जानेवारी हा जन्मदिवस राज्यात साजरा केला जातो. स्त्रियांच्या मुक्तीदात्या असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी दिलेले शैक्षणिक योगदान, त्यांनी आचरणात आणलेली स्त्री उद्धारासाठीची मुल्ये भावी पिढीसाठी अत्यंत महत्वाची आहेत.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे स्त्री शिक्षणातील योगदान, त्यांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचविणे व त्यांनी रुजविलेले शैक्षणिक मूल्ये पुढील पिढीत संक्रमित होणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती “महिला शिक्षण दिन” म्हणून साजरी करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय :
थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ञ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा ३ जानेवारी हा जन्म दिवस राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये तसेच, शासकीय, निमशासकीय कार्यालयात “महिला शिक्षण दिन” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निमित्त खालीलप्रमाणे विविध उपक्रम, कार्यक्रम साजरे करण्यात यावेत:-
१. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात व शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात यावे.
२. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक यांनी त्यांच्या कार्याविपयी एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा.
३. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित व्याख्यानांचे आयोजन करावे .
४. विद्यार्थ्यांचे गट करून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विपयी चर्चासत्रे घेण्यात यावीत.
५. ऑनलाइन वेबिनार आयोजित करून स्त्री शिक्षणाचे महत्व, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्फूर्तिदायी लेखन व विचार यावर परिसंवाद आयोजित करावा.
६. महिला शिक्षिका, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांचे स्त्री शिक्षणातील महत्व लक्षात घेऊन त्यांचा गौरव करणे.
७. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील घडलेल्या विविध घटनांवर आधारित पथनाट्य, एकपात्री नाटक, यांचे आयोजन करणे.
८. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म दिनानिमित्त राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या इयत्ता १ ली ते १२ वी मधील सर्व विद्यार्थ्यांनी भापण / वक्तृत्त्व स्पर्धा, निबंध लेखन,परिसंवाद, एकांकिका यासारखे कार्यक्रम स्तरनिहाय / गटनिहाय रावविण्यात यावेत. उपक्रमात सहभागी होऊन #महिलाशिक्षणदिन, #मी_सावित्री, #mee_savitri या HASHTAG (#) वर व्हिडीओ व साहित्य upload करावे. याशिवाय विविध समाज माध्यमावर (फेसवुक, इंस्टाग्राम, ट्वीटर) अपलोड करावेत. यासाठी शिक्षक व पालकांनी त्यांना सहकार्य करावे.
सावित्रीबाई फुले जयंती निमित्त “ महिला शिक्षण दिन साजरा करण्यासाठी खालील उपक्रमांचे
आयोजन करण्यात यावे:







महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
९ . वरील सर्व कार्यक्रमांचे आयोजन करताना कोविड -१९ चा विचार करून सर्व नियमावलीचे पालन
करण्यात यावे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२०१२२४१७५६२६१९२१ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल
स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments

Total Pageviews