Scholarship Exam 5th and 8th
विषय :- पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी)
फेब्रुवारी २०२३ च्या अधिसूचनेस प्रसिध्दी मिळणेबाबत...
महोदय,
उपरोक्त विषयानुसार आपणास सविनय सादर करण्यात येते की, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) दि. १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे.
सदर परीक्षेची अधिसूचना परिषदेच्या www.mscepune.in
व
या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर अधिसूचना या पत्रासोबत जोडण्यात येत आहे. कृपया सदर अधिसूचनेस राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून, आकाशवाणीवरून व दूरध्वनी केंद्रावरून योग्य ती प्रसिध्दी विनामूल्य देण्यात यावी अशी विनंती आहे.
सोबत :- अधिसूचना
प्रत माहिती व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी :
आपला विश्वासू,
(शैलजा दराडे)
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे - ०१.
घटक | टेस्ट लिंक |
भाषा | |
गणित | |
English | |
बुद्धिमत्ता |
0 Comments