MDM Back Dated Information | शालेय पोषण आहार योजना बॅक डेटेड माहिती भरणे
विषय :- प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत एमडीएम पोर्टलवर मागील कालावधीतील दैनंदिन उपस्थितीची नोंद करणे बाबत.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत योजनेस पात्र असणा-या शाळांनी शाळास्तरावर आहार घेणाऱ्या लाभार्थी विद्यार्थ्यांची माहिती मोबाईल अॅप तथा वेबसाईटच्या माध्यमातून नियमितपणे संकेतस्थळावर नोंदविणे आवश्यक आहे. प्रस्तुत माहितीच्या आधारे शाळांची ऑनलाईन देयके जनरेट होत आहेत. याबाबत सर्व जिल्ह्यांना पत्र व व्हॉट्सऑॅपद्वारे वेळोवेळी सुचना देऊन देखील काही शाळांची माहिती भरणे प्रलंबित असल्याने, सदरची सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत विनंती संचालनालयाकडे करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेस पात्र असणाऱ्या सर्व शाळांना ( केंद्रीय स्वयंपाकगृह आणि ग्रामीणभागातील) माहे एप्रिल, २०२३ ते जानेवारी २०२४ अखेरच्या कालावधीतील प्रलंबित माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. सदर सुविधा दि.०६.०३.२०२४ पर्यत उपलब्ध असेल, तदनंतर कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही कारणास्तव पुनपुनश्च बँक डेटेड माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार नाही. याबाबत आपल्या जिल्ह्यातील सर्व शाळाप्रमुखांना अवगत करुन देण्यात यावे. तसेच निर्धारित कालावधीमध्ये प्रलंबित शाळांकडून माहिती भरली जाईल याबाबत योग्य ती कार्यवाही करावी..
शाळा लॉगिन वरून मागील दिवसाची माहिती भरता येईल.
माहिती भरण्यासाठी खालील वेबसाईटला भेट द्या.
https://education.maharashtra.gov.in/mdm/users/login/5
2 Comments
Nice information Sir G
ReplyDeleteThanks
ReplyDelete