MSCE Pune Scholarship Exam Final Answer Key 2023 | शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी आठवी अंतिम उत्तरसूची
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे
पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी)
रविवार दि. १२ फेब्रुवारी, २०२३
अंतिम उत्तरसूची
विषय:- पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी)
दि. 12 फेब्रुवारी, 2023 - अंतिम उत्तरसूचीच्या प्रसिध्दीपत्रकाबाबत...
महोदय,
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी)
दि. 12 फेब्रुवारी, 2023 रोजी या कार्यालयामार्फत घेण्यात आली. सदर परीक्षेची इयत्तानिहाय, पेपरनिहाय अंतिम
उत्तरसूची परिषदेच्या www.mscepune.in व https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर या परीक्षेचे परीक्षार्थी, मार्गदर्शक शिक्षक, पालक, शाळा आणि क्षेत्रिय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिध्द करण्यात आली आहे. सोबत प्रसिध्दीपत्रक जोडले आहे.
सोबत :- प्रसिध्दीपत्रक
प्रसिध्दीपत्रक
रविवार दि. १२ फेब्रुवारी, २०२३ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) या परीक्षेची इयत्तानिहाय,पेपरनिहाय अंतरिम (तात्पुरती) उत्तरसूची दि. १७ फेब्रुवारी, २०२३ रोजी परिषदेच्या
www.mscepune.in व https://www.mscepuppss.in
या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती.
अंतरिम उत्तरसूचीसंदर्भात विहीत मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषय तज्ज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परीक्षा परिषदेने उत्तरसूची सुधारित केली आहे. या उत्तरसूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. या अंतिम उत्तरसूचीबाबत आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, या अंतिम उत्तरसूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येईल. याची कृपया नोंद घ्यावी.
सदर प्रसिध्दीपत्रक अंतिम उत्तरसूचीसह परिषदेच्या
https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावरही प्रसिध्द करण्यात येत आहे.
ठिकाण - पुणे
दिनांक १०/०३/२०२३
www.mscepune.in व
शैलजा दराडे
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे - ०१
इयत्ता पाचवी |
||
उत्तरपत्रिका |
||
पेपर 1 |
पेपर 2 |
|
मराठी माध्यम |
||
English Medium |
||
उर्दू माध्यम |
||
0 Comments