Regarding Scholarship Exam date | शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्याबाबत
विषय:- पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) २०२२
परीक्षा पुढे ढकलल्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक.....
संदर्भ :- १. शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ अधिसूचना जा.क्र.मरा/ शिष्यवृत्ती / २०२१-२२/३५०४, दि. ०१/१२/२०२१.
२. या कार्यालयाचे प्रसिध्दीपत्रक दि. २२/०४/२०२२
महोदय,
उपरोक्त विषयानुसार आपणास सविनय सादर करण्यात येते की, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही दि. २०/०७/२०२२ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार असलेबाबत संदर्भ क्र. २ च्या प्रसिध्दीपत्रकान्वये जाहिर करण्यात आले होते.
तथापि सद्यस्थितीत राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पुरसदृश्य स्थिती व बहुतांश ठिकाणी भुस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणी तसेच विद्यार्थी हित व त्यांची सुरक्षा लक्षात घेता सदर परीक्षा दि. २०/०७/२०२२ ऐवजी रविवार दि. ३१/०७/२०२२ रोजी घेण्यात येईल.यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र दि. ३१/०७/२०२२ च्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल.
सदर प्रसिध्दीपत्रकास राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून, आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रावरून विनामूल्य प्रसिध्दी देण्यात यावी, अशी आपणास विनंती आहे.
सोबत :- प्रसिध्दीपत्रक
प्रत माहितीस्तव सविनय सादर :-
आपली विश्वासू,
आयुक्त,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,
पुणे.
-०१.
प्रसिध्दीपत्रक
संदर्भ या कार्यालयाचे प्रसिध्दीपत्रक दि. २२/०४/२०२२.
उपरोक्त संदर्भीय प्रसिध्दीपत्रकान्वये परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ही दि. २०/०७/२०२२ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार असलेबाबत जाहिर करण्यात आले होते.
तथापि सद्यस्थितीत राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पुरसदृश्य स्थिती व बहुतांश ठिकाणी भुस्खलनामुळे वाहतूक बंद असल्याने विद्यार्थ्यांना दळणवळणास येणाऱ्या अडचणी तसेच विद्यार्थी हित व त्यांची सुरक्षा लक्षात घेता सदर परीक्षा दि. २०/०७/२०२२ ऐवजी रविवार दि. ३१/०७/२०२२ रोजी घेण्यात येईल.यापूर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र दि. ३१/०७/२०२२ च्या परीक्षेसाठी ग्राह्य धरण्यात येईल.
उपरोक्तनुसार झालेल्या बदलाची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.
0 Comments