Ticker

10/recent/ticker-posts

शाळा पूर्व तयारी मेळावा| Data entry | Shala Purva Tayari Melava

 शाळा पूर्व तयारी मेळावा | Shala Purva Tayari Melava | Data entry 









विषय:- शाळा पूर्व तयारी अभियान अंतर्गत मेळावा आयोजित केल्यानंतर नंतर खालील लिंक वर लॉगिन करून शाळेची माहिती भरावी.


 

या अभियानाची माहिती भरण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करावा लिंक ला 

ओपन केल्यानंतर बाजूला दिलेल्या फोटो प्रमाणे पेज ओपन होईल.

 

 

 

 

 

 

 

 

 

 


  1. सदर लिंक वर सर्व शाळेची माहिती अपेक्षित वेळेनुसार येणे अपेक्षित आहे.
  2. सदर अभियानाची माहिती आपल्या WhatsApp वर मिळविण्यासाठी  आपण 9011131361/ 8381023480 यापैकी कोणत्याही नंबर वर 
  3. WhatsApp द्वारे SRM हा मेसेज टाईप करून पाठवावा आपल्याला अपेक्षित असणाऱ्या माहिती साठी दिलेल्या पर्यायानुसार रिप्लाय द्यावा.

 

 

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये, आपणास कळविण्यात येते की, शैक्षणिक वर्ष सन 2022-23 मध्ये इयत्ता पहिलीला दाखल पात्र बालकांसाठी शाळापूर्व तयारी (पहिले पाऊल) अभियानाचे अयोजन करण्यात येत आहे.


त्याअनुशंगाने नविन शैक्षणिक वर्षात इ. 1 ली प्रवेशपात्र बालकांची शाळापूर्व तयारी करून घेण्यात येणार आहे. शाळा सुरु होण्या अगोदर 10 ते 12 आठवडे बालकांची शाळापूर्व तयारी पालकांच्या मदतीने करुन घेण्याचे या

उपक्रमांतर्गत नियोजित आहे.

शाळापूर्व तयारी (पहिले पाऊल) अभियान अंतर्गत प्रशिक्षण तालुका स्तर, केंद्रस्तर, व शाळास्तर या पध्दतीने राबविण्यात येणार आहे. 

तालुका स्तरावरील प्रशिक्षण घेतलेले प्रशिक्षणार्थी शिक्षक हे केंद्रस्तरावर सुलभक म्हणून कामकाज पाहणार आहे.केंद्रस्तरावर एक दिवस प्रशिक्षण झाल्यानंतर शाळास्तरावर मेळावा क्र. 1 व मेळावा क्र.2 चे आयोजन करावयाचे आहे.


शाळा पूर्वतयारी आयोजनाचे 21 एप्रिल 2023 चे पत्र


वि शाळा पूर्वतयारी आयोजनाचे 21 एप्रिल चे पत्र  डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.





 


शाळा स्तरावर मेळावा आयोजनाच्या अनुषंगाने आवश्यक

सूचना पुढील प्रमाणे :

৭. जिल्ह्यातील जि.प. , म.न.पा., व न.पा. च्या सर्व शाळांमध्ये मेळाव्याचे नियोजन व आयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी जिल्हा परिषद-शिक्षण विभाग, प्रशासन अधिकारी-म.न.पा. व न.पा. व ICDs विभाग यांच्या समन्वयाने करावे. मेळावे आयोजन करणेबाबतचे नियोजन पर्यवेक्षकीय अधिकारी व शाळांना कळवावे.

२. दैनंदिन शालेय कामकाजाच्या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे. मेळाव्याचा कालावधी साधारणपणे ४ तासांचा असावा.


३. शाळेचे वातावरण प्रसन्न व आरोग्यदायी असावे याकरिता प्राधान्याने शालेय परिसर स्वच्छता करण्यात यावी.

४. मेळाव्यामध्ये इयत्ता पहिलीला प्रवेशित /दाखल सर्व बालके व त्यांचे पालक सहभागी व्हावे, याकरिता मेळावा आयोजनाच्या आधी एक / दोन दिवस मेळाव्याबाबत वस्ती, गाव स्तरावर प्रभातफेरी, दवंडी देवून, समाजमाध्यमांचा उपयोग करून तसेच पोस्टर्स लावून जनजागृती करण्यात यावी, व त्या माध्यमातून इयत्ता पहिलीतील सर्व बालकांना व त्यांच्या पालकांना मेळाव्यात सहभागी करण्यात यावे.

५. उपक्रमाच्या अनुषंगाने झालेल्या प्रशिक्षणातील मार्गदर्शनानुसार मेळाव्यामध्ये ७ स्टॉल्स लावले जावेत.

सर्व स्टॉल्सवर बालकांच्या कृतीच्या नोंदी विकास पत्रावर दुस्या मेळाव्याच्या रकान्यात करण्यात याव्यात. 

सदर ७ स्टॉल्स पुढीलप्रमाणे : 

१ ) नोंदणी (रजिस्ट्रशन),

 २) शारीरिक विकास (सू्ष्म व स्थूल स्नायू विकास), 

३) बौद्धिक विकास, 

४) सामाजिक आणि भावनात्मक विकास, 

५) भाषा विकास, 

६)गणनपूर्व तयारी,

 ७) पालकांना मार्गदर्शन.

६. शाळास्तरावरील मेळावा क्र.२ चे आयोजन करण्याच्या अनुषंगाने शिक्षणाधिकारी- प्राथमिक, प्राचार्य - डायट व जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी समन्वयाने सर्व गटशिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, प्रशासन अधिकारी, म.न.पा. व न. पा. यांच्या बैठकांचे आयोजन करावे.

७. गटशिक्षणाधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची सभा घेऊन शाळास्तरावरील मेळावा क्र.२ चे नियोजन करावे.

८. केंद्रप्रमुख यांनी केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांची बैठक घेऊन मेळाव्याच्या आयोजनाबाबत नियोजन करावे. त्यानुसार मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका व स्वयंसेवक यांची बैठक घेऊन शाळास्तरावरील मेळाव्याचे नियोजन करावे.

९. मेळाव्या संदर्भातील फोटो, व्हिडिओ इ. माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित करीत असतांना

#ShalapurvaTayariAbhiyan2023,  

 #ShalapurvaTayari2023 

हशटेगचा (#) उपयोग करावा. तसेच मेळाव्या संदर्भात  प्रसारित करण्यात  येणाऱ्या  पोस्टसाठी SCERT,

महाराष्ट्रच्या https://www.facebook.com/scert.maharashtra या फेसबुक पेजला टेंग करण्यात यावे.

৭०.शाळास्तरावरील दुस्या मेळाव्याची सांख्यिकीय माहिती पुढील मुद्यांच्या आधारे आपल्या स्तरावर गुगल लिंकद्वारे संकलित करण्यात यावी.

 


१৭.उपरोक्त नमुन्याप्रमाणे शाळापूर्व तयारी मेळावा क्र.२ ची माहिती संकलित करून, मेळावा झाल्यानंतर पुढील आठ दिवसात जिल्ह्यतील जि.प. म.न.पा.., व न.पा. च्या सर्व शाळांची एकत्रित माहिती( एकसेल शीट) बालহिक्षण विभागास सादर करावी. माहिती संकलनाकरिता राज्यस्तरावरून कोणतीही अन्य लिंक देण्यात येणार नाही.

१२.शाळास्तरावरील मेळावा क्र. १ चे आयोजन सुव्यवस्थित रित्या व्हावे या करिता सर्व पर्थवेक्षीय अधिकारी यांनी योग्य सनियंत्रण करावे व मेळाव्यास भेटी द्याव्यात.

৭३.शाळांनी अधिकाधिक लोकप्रतिनिर्धींना मेळाव्यासाठी आमंत्रित करावे.

৭४.शाळापूर्व तयारी अभियान उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या बालकांच्या शाळापूर्व तयारीची जोडणी शिक्षकांनी इयत्ता पहिलीच्या पाठ्वक्रमाशी/ विद्याप्रवेश मोड्यूलशी करावी.

१५.मेळावे आयोजित करीत असताना शासनाने वेळोवेळी दिलेल्या  कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्यात यावे.

सन 2023/24 साठी

व   विकासपत्र  डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.



   शाळेतले पहिले पाऊल पुस्तक  डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.



सन 2022/23 साठी

     विकासपत्र  डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.




   शाळा पूर्व तयारी अभियान आयोजकासाठी  डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.


   बालकासाठी कृतिपत्रिका शाळा पूर्व तयारी कार्ड डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.



पालक समूहासाठी आयडिया कार्ड डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा.

सौजन्य
  प्रथम संस्था, MSCERT, समग्र शिक्षा आणि शिक्षण विभाग


संचालक

राज्य शैक्षणिक संशोधन व

प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे ३०.

Post a Comment

0 Comments

Total Pageviews