Senior Grade and Selected Grade Training | वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत
महत्त्वाची सूचना
ज्या प्रशिक्षणार्थी यांचे अद्याप ऑनलाईन प्रशिक्षण सुरू झाले नाही केवळ त्यांच्यासाठी
📌ज्या प्रशिक्षणार्थी यांना आपले ईमेल बदलायचे आहेत,
📌प्रशिक्षण प्रकार बदल करावयाचा आहे,
📌प्रशिक्षण गट बदल करावयाचा आह
त्यांनी कृपया केवळ रविवार, दि.१९ जुन २०२२ रोजी संध्याकाळी ८.०० पर्यंत https://training.scertmaha.ac.in यावरील नोंदणी दुरुस्ती प्रक्रिया वरील सुविधा वापरून करावेत. त्यानंतर कोणतेही बदल करण्याची संधी मिळणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
आपण बदल केल्यानंतर बुधवार, दि. २२.०६.२०२२ पासून आपणास सदर कोर्स उपलब्ध होतील.
अधिक माहितीसाठी आपण https://training.scertmaha.ac.in
संकेस्थळावरील माहिती व सूचना याचे अवलोकन करावे ही विनंती.
दैनिक शंका समाधान व मार्गदर्शन सत्र झूम लिंक
Meeting ID: 872 9666 0474Passcode: SCERT
राज्यातील शिक्षक/ मुख्याध्यापक /अध्यापकाचार्य / प्राचार्य यांच्यासाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये दिनांक १ जून २०२२ पासून सुरू होत आहे.
सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपामध्ये राज्यातील एकृण ९४,५४१ नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थीसाठी एकाच वेळी आयोजित करण्यात आले असून, यामध्ये राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील नोंदणीकृत प्रशिक्षणार्थी सहभागी होऊन ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यंचे मार्फत विकसित प्रशिक्षण (ई- कोर्स) पूर्ण करून त्यावरील स्वाध्याय, चाचणी सोडवून वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करू शकणार आहेत.
सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे एकूण ५० ते ६० तासांचे असणार असून सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी एकूण ३० दिवसांचा कालावधी देण्यात येईल. त्यामुळे प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षक आपले प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपामध्ये एकूण ३० दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांच्या उपलश्थ वेळेनुसार, पूर्ण करू शकणार आहेत. सदरके ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पात्र प्रशिक्षणाथ्यांस त्यच ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या गाध्यमातून प्रशिक्षण प्रमाणप्त्र उपलब्ध होणार आहे.
युजर आय. डी व पासवर्ड प्राप्त असणारे मात्र इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड प्रणालीवर अद्याप लॉगिन न झालेल्या प्रशिक्षणार्थी यांची जिल्हानिहाय यादी
राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, अध्यापक विद्यालयातील अध्यापक, प्राचार्य यांच्यासाठी आयोजित निवड श्रेणी प्रशिक्षण व वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण बाबत सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ) बाबतचे युट्यूब लाईव्ह सत्र
सदर प्रशिक्षणवाबतची सर्व माहिती दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ११.०০० वाजता
या यु ट्यूब लाईव्ह सत्राद्वारे देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थीनीं सदर
उद्धोधन सत्रास उपस्थित रहावे.तसेच सर्व पात्र प्रशिक्षणाथ्थयासाठी दिनांक १ जून २०२२ पासून ३० जून २०२२ पर्यंत तांत्रिक अडचणी संदर्भात मार्गदर्शन सत्रांचे आयोजन देखील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे मार्फत केले जाणार आहे. याबाबतची सर्व माहिती दि.१ जून २०२२ रोजी आयोजित यु ट्यूब लाईव्ह सत्राद्वारे
दिली जाईल.
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण Infosys Springboard App या ॲप व्दारे होणार आहे.
सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी खालील ॲप डाऊनलोड करा.
Infosys Springboard App
(रमाकांत काठमोरे)
सहसंचालक,
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण
परिषद, महाराष्ट्र, पुणे.
0 Comments