Ticker

10/recent/ticker-posts

वर्तुळ-त्रिज्या व्यास जीवा| iyatta Pachvi Ganit Vartul |इ.5वी-गणित|

  वर्तुळ-त्रिज्या व्यास जीवा| iyatta Pachvi  Ganit Vartul |इ.5वी-गणित|



उपघटक - त्रिज्या, व्यास, जीवा, केंद्र, परीघ, आंतरभाग, बाह्यभाग, वर्तुळकंस त्रिज्या - वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू यांना जोडणारी रेषा म्हणजे त्रिज्या होय. एका वर्तुळाला अनेक त्रिज्या असतात. 

जीवा - वर्तळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा म्हणजे जीवा होय. 

व्यास - वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला वर्तुळाचा व्यास म्हणतात. व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते.

वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट लांबीचा असतो. 

 वर्तुळाचा आंतरभाग - वर्तुळाच्या आत असलेल्या भागाला वर्तुळाचा आंतरभाग म्हणतात. 

वर्तुळाचा बाह्यभाग -वर्तुळाच्या बाहेर असेलल्या भागाला वर्तुळाचा बाह्यभाग म्हणतात. 

वर्तुळाचा परीघ - वर्तुळाच्या वर्तुळाकार लांबीला परीघ म्हणतात.  वर्तुळ कंस - वर्तुळ परीघाच्या लहान मोठ्या भागांना वर्तुळकंस म्हणतात.

वर्तुळ कंसाला तीन अक्षरी नाव देतात

Post a Comment

0 Comments

Total Pageviews