सुगी कविता स्वाध्याय | इयत्ता तिसरी | विषय मराठी | sugi kavita
रानातल्या बोरीला
वाजून आली थंडी,
काट्यांतून लगडली
बोरे सात खंडी.
वळणावरचे झाड
थरकापू लागले,
खट्टे मिठे पेरू
जागोजाग लोंबले.
ओलीचिंब झाली
हरभऱ्याची राने,
पानांतले पोपट
गाऊ लागले गाणे.
चिंचेचे हातपाय
काकडून झाले वाकडे,
जाळीतून डोकावले
गाभुळले आकडे.
थंडी आली पेटवा आगटी
शेका हात गार,
शेकता शेकता तोंडात टाका
ओल्या शेंगा चार.
-शैला लोहिया
0 Comments