Passage Reading उतारा वाचन क्रमांक 6
शरीराचे वजन कमी करण्यासाठी आणि योग्य वजन ठेवण्यासाठी फक्त दोनच सोपे नियम आहेत. ते म्हणजे गोड कमी खाणे आणि वसामुक्त संतुलित आहार घेणे व अधिक व्यायाम करणे. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला उपाशी'राहण्याची गरज नाही. जर तुम्ही साखर, केक, बिस्किटे कमी प्रमाणात आणि फळे, भाज्या व पाणी पुष्कळ प्रमाणात घेतले तर तुमचे वजन कमी होऊन तुम्ही स्वस्थ राहाल. रोज फिरायला जावे किंवा सायकल चालवावी. टेलिव्हीजन पाहणे किंवा व्हीडियो गेम खेळण्याच्या ऐवजी जास्त सक्रिय राहणे हे अधिक चांगले आहे.
0 Comments