Ticker

10/recent/ticker-posts

रानपाखरा कविता | इयत्ता तिसरी मराठी | Ranpakhara Kavita Class 3rd Marathi

 रानपाखरा कविता | इयत्ता तिसरी मराठी | Ranpakhara Kavita Class 3rd Marathi





 रानपाखरा
ऐका. म्हणा. वाचा.
रानपाखरा, रोज सकाळी येसी माझ्या घरा,
गाणे गाउन मला उठविसी मित्र जिवाचा खरा.
शरीर निळसर, शोभे झालर ठिपक्यांची त्यावरी,
सतेज डोळे चमचम करती जणु रत्ने गोजिरी.
पाय चिमुकले, पंख चिमुकले, देह तुझा सानुला,
अफाट आभाळातुन कैसे उडता येते तुला ?
रात्र संपता डोंगर चढुनी वर येतो भास्कर,
तूही त्याच्या संगे येसी गात गात सुस्वर.
तुझ्यासारखे जावे वाटे उडत मजेने वरी,
नेशिल का मज तुझ्या बिऱ्हाडी बसवुनि पंखांवरी ?
माय तुझी येईल, सूर्य ही येइल भेटायला,
मजाच होइल सख्या पाखरा, नेइ एकदा मला.

                               कवी गोपीनाथ
-



Post a Comment

0 Comments

Total Pageviews