Ticker

10/recent/ticker-posts

इयत्‍ता पाचवी कापणी कविता | Class 5th Kapani poem marathi

 इयत्‍ता पाचवी कापणी कविता | Class 5th Kapani poem marathi 





आता लागे मार्गेसर,
आली कापनी कापनी.
आज करे खालेवव्हे,
डाव्या डोयाची पापनी!
पडे जमीनीले तढे,
आली कापनी कापनी.
तशी माझ्या डोयापुढे,
उभी दान्याची मापनी.
शेत पिवये धम्मक,
आली कापनी कापनी.
आता धरा रे हिंमत,
इय्ये ठेवा पाजवुनी.
पीक पिवये पिवये,
आली कापनी कापनी.
हातामधी धरा इय्ये,
खाले ठेवा रे गोफनी.
काप काप माझ्या इय्या,
आली कापनी कापनी.
थाप लागली पिकाची
आली डोयाले झापनी!
आली पुढे रगडनी,
आता कापनी कापनी.
खये करा रे तय्यार,
हाती घीसन चोपनी.

कवयित्री
- बहिणाबाई चौधरी

Post a Comment

1 Comments

  1. तात्या साहेब सिरसाट
    हषद

    ReplyDelete

Total Pageviews