Ticker

10/recent/ticker-posts

| इयत्‍ता तिसरी सुटटीच्‍या दिवसात कविता | Class 3 kavita suttichya diwasat

इयत्ता तिसरी सुटटीच्‍या दिवसात कविता | Class 3 kavita suttichya diwasat 






खालील कविता वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या

१५. सुट्टीच्या दिवसांत

सुट्टीच्या दिवसांत वाटते,
खुशाल आकाशात उडावे.
इंद्रधनूच्या घसरगुंडीवर,
खाली-वर, वर-खाली व्हावे.
सुट्टीच्या दिवसांना असतो,
वास निराळा घमघमणारा.
उन्हातही अंगाला बिलगे,
माळावरचा उनाड वारा.
सुट्टीच्या दिवशी जादूने,
अद्भुत होते नेहमीचे जग.
मळक्या विटक्या वस्तूंवरती,
नवतेजाची चमके झगमग.
सुट्टीच्या दिवशी शरीरातुन,
प्रचंड शक्ती राही उसळत.
वाटे पोहू साती सागर,
गगनचुंबी ओलांडू पर्वत.
सुटे भान काळाचे सगळे,
सुट्टीमध्ये कसे काय तेआठवड्या-महिन्या-वर्षांचे,
कालचक्र मोडूनच पडते !

कवी - अनंत भावे 





      

Result of Competition 



आपणास मिळालेला रोल नंबर टाकून निकाल पहा व सर्टिफिकेट डाऊनलोड करून घ्या.
निकालासाठी खूप खूप शुभेच्छा

  
 

Post a Comment

0 Comments

Total Pageviews