Ticker

10/recent/ticker-posts

शिकू आनंदे Learn with Fun 1st to 5th 1st January

  शिकू  आनंदे (Learn with Fun)  या उपक्रमाबाबत पहिली ते पाचवी      


 उपरोक्त  विषयानुसार, मार्च २०२० पासून कोविडच्या
प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व  शाळा बंद होत्या.टप्याटप्याने सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. शाळेतील सर्व  मुलांचे शिकणे आनंददायी पद्धतीने सुरु रहावे, या हेतूने  राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत online पद्धतीने विविध शैक्षणिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. परिषेदेच्या सामाजिक शास्र व कला क्रीडा विभागामार्फत  इ.१ ली ते ८ वीच्या वर्गात अध्ययन करणाऱ्या राज्यातील सर्व मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव या विषयाबाबत दर शनिवारी दि.३ जुलै २०२१ पासून  online पद्धतीने *“शिकू  आनंदे ”* (Learn with Fun) हा उपक्रम  सुरू करण्यात आला आहे. दि. १ जानेवारी २०२२ रोजीच्या सत्रात *संगीतबद्ध हालचाली,नृत्य,गीतगायन, दिनदर्शिका* या विषयांबाबत तज्ञ शिक्षकाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. स.९ ते १० या वेळेत इ.१ ली ते ५ वी साठी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. पुढील यु ट्यूब लिंकद्वारे आपणाला या कार्यक्रमात सहभागी होता येईल.  



 स.१० ते ११ या वेळेत इ. ६ वी ते ८ वी च्या मुलांसाठी कार्यक्रम संपन्न होणार असून पुढील यु-ट्यूब लिंकद्वारे सहभागी होता येईल.
 


 याबाबत वरिष्ठ अधिव्याख्याता, गटशिक्षणाधिकारी,अधिव्याख्याता, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख,विषय सहायक  यांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे. तसेच whats app समूहाद्वारे आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व  शाळा व विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहचवावी. जास्तीत जास्त विद्यार्थी या उपक्रमात सहभागी होतील याबाबत योग्य कार्यवाही करावी.

 एम देवेंदर सिंह (भा.प्र.से)
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र पुणे, 

Post a Comment

0 Comments

Total Pageviews