अनाम वीरा इयत्ता सातवी मराठी
खालील कविता वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या.
अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली न वात !
धगधगतां समराच्या ज्वाला या देशाकाशी
जळावयास्तव संसारातुन उठोनिया जाशी!
मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा !
जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव !
जरी न गातिल भाट डफावर तुओं यशोगान !
सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान !
काळोखातुनि विजयाचा ये पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्युंजय वीरा !
0 Comments