Passage Reading
Read the following passage and answer the following questions.
खालील उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा.
कस्तुरबा फ़ार निश्चयी होत्या. एकदा एखादी गोष्ट करायची ठरवली की, कोणतीही अडचण आली, तरी त्यामाघार घेत नसत. दांडीयात्रेच्या वेळेस त्या फ़ार अशक्त झाल्या होत्या. त्यांनी सत्याग्रह करू नये, असे गांधीजींना वाटत होते; पण कस्तूरबा म्हणाल्या, “मला माझ्या शरीराची पर्वा नाही. माझ्या शरीरापेक्षा मला माझ्या देशाचं स्वातंत्र्य जास्त महत्वाचं वाटतं." तशा परिस्थितीतही त्यांनी सत्याग्रहात सहभाग घेतला. इ.स. १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात गांधीजींच्याबरोबर कस्तुरबांना पुण्याच्या आगाखान प्रासादामध्ये कैद करून ठेवण्यात आले होते. तेथे त्या आजारी पडल्या.वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी त्या प्रासादातच त्यांचा अंत झाला. आगाखान प्रासादाजवळच पूज्य कस्तूरबाजींची संगमेश्वराने बांधलेली समाधी आहे.
Pdf स्वरूपात पेपर डाऊनलोड करण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा
0 Comments