Ticker

    Loading......

NAS Letter to all districts

 NAS Letter to all districts



NAS Letter to all districts Pdf




विषय :- राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS २०२१) अंमलबजावणीबाबत सूचना.

संदर्भ :- १. मा. मनीष गर्ग, सह सचिव, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचे पत्र जा. क्र. १९-४१२०१९-IS-B दिनांक ०५/११/२०२१.

उपरोक्त संदर्भीय विषयान्वये शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांचे मार्फत संपूर्ण देशभरात शुक्रवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्तीमधील संपादणूकीचे मूल्यांकन करणे व देशाच्या शिक्षण प्रक्रियेच्या आरोग्याचे मूल्यांकन करणे यासाठी एकाच दिवशी संपूर्ण देशात होणार आहे. त्यामुळे प्रस्तुत सर्वेक्षण चाचणीचे अनन्यसाधारण महत्व आहे. प्रस्तुत सर्वेक्षणासाठी राज्यातील इयत्ता ३री, ५वी, ८ वी व १० वी चे एकूण ७३३० शाळा, २३४०५५विद्यार्थी यांची निवड केंद्र शासनामार्फत करण्यात आलेली आहे. या सर्वेक्षणासाठी आपण आपल्या अधिनस्त सर्व शाळा

व क्षेत्रिय यंत्रणेस सज्ज ठेवणे महत्वाचे आहे. देशपातळीवरील एक भरीव कार्यक्रम म्हणून सदर सर्वेक्षणातून प्राप्त विद्यार्थी संपादणूक माहितीचे अहवाल जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर तयार करण्यात येणार आहेत.

यासाठी आपण शुक्रवार दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी निवड झालेल्या आपल्या अधिनस्त शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व क्षेत्रीय अन्वेषक यांना पुढीलप्रमाणे सूचित करून उपस्थित ठेवावे.

१. दिनांक १२ नोव्हेंबर २०२१, रोजी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) केंद्र शासनामार्फत निवडलेल्या निवडक शाळांमध्ये घेण्यात येणार आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय दिनांक २४ सप्टेंबर,

२०२१ नुसार शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता ५ वी ते १२ वी व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ वी च्या शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत. परंतू तरीही राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) केंद्र शासनामार्फत संपूर्ण देशभरात एकाच वेळी होणार असल्याने ग्रामीण व शहरी भागात प्रस्तुत सर्वेक्षणासाठी निवडलेल्या सर्व व्यवस्थापन, माध्यमाच्या

शाळातील ३ री, ५ वी, ८ वी व १० वी चे वर्ग दिनांक १२ नोव्हेंबर २०२१, रोजी सुरु ठेवून संबंधित वर्गातील विद्यार्थी, शिक्षक १०० टक्के उपस्थित ठेवण्यात यावेत.

२. सदर सर्वेक्षण इयता ३ री, ५ वी, ८ वी व १० वी च्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी लागू असणार आहे.

३. यासाठी इयता ३री,५वी, ८ वी व १० वी चे वर्ग असलेली शाळा यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने (Random Sampling) निवडण्यात आलेल्या असून आपणास त्यांची यादी पूर्वीच पाठविण्यात आलेली आहे.

४. आपण आपल्या जिल्ह्यासाठी नेमणूक करण्यात आलेल्या जिल्हा नोडल अधिकारी (DNO) यांच्याशी चर्चा करून निवडलेल्या शाळांचे सद्यस्थितीबाबत योग्य ते नियोजन करावे. जिल्हा नोडल अधिकारी (DNO) म्हणून

प्रत्येक जिल्हयातील प्राचार्य ,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

५. जिल्हा नोडल अधिकारी (DNO) यांना प्रत्येक जिल्हयातील निवडलेल्या शाळा, वर्ग, माध्यम, क्षेत्रिय

अन्वेषक (F.I.), निरीक्षक (Observer), जिल्हा परिरक्षक (Custodian) व जिल्हा स्तरीय समन्वयक (DLC) यांची ही माहिती केंद्र शासनाकडून पुरविण्यात आलेली आहे.

६. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व व्यवस्थापन व सर्व माध्यमाच्या शाळांचा समावेश असून स्तरीय यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने शाळांची निवड केंद्र शासनाकडून करण्यात आलेली आहे.

७. शाळानिहाय निवडलेल्या क्षेत्रिय अन्वेषक (F.I.) यांनी शाळेत सकाळी ७.३० वाजता तर निरीक्षक (Observer) यांनी सकाळी ८.३० वाजता उपस्थित रहावे.

८.राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण पुर्वतयारीचा एक भाग म्हणून सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळा या मुख्याध्यापक,सर्व शिक्षक, विद्यार्थी यांच्या समवेत सर्वेक्षणाच्या दिवसासह दिनांक ११ ते १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरु

राहतील, याची पूर्ण जबाबदारी आपली राहील.NAS साठी निवडलेल्या शाळांनी दि. १२ नोव्हेंबर २०२१ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन, क्रीडा दिन, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा इतर कोणतेही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येवू नये.

९. शासन आदेशाप्रमाणे कोविड-१९ संदर्भातील सर्व मार्गदर्शक तत्वे उदा. निवडलेल्या शाळांची स्वच्छता,निर्जंतुकीकरण, ज्या मोठ्या हॉलमध्ये चाचणी घेण्यात येणार आहे त्या वर्गाची स्वच्छता, बैठक व्यवस्था, हॅन्ड सॅनिटायझर, मास्कचा वापर, सुरक्षित अंतरानुसार बाकांची व्यवस्था वगैरे यांचे काटेकोर पालन करण्यात यावे.

१०.एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल, अशी बैठकीची व्यवस्था करावी. बाके उपलब्ध नसल्यास स्वच्छ चटई वापरून पुरेसे अंतर राखण्यात यावे.

११. चाचणीसाठी निवड केलेल्या शाळेचे, माध्यम व इयत्तानिहाय वर्गाच्या एकापेक्षा जास्त तुकड्या असतील तर सर्व तुकड्यातील विद्यार्थी उपस्थित ठेवावे. त्यापैकी एक तुकडी स्तरीय यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने (Random Sampling - chit draw Method) क्षेत्रिय अन्वेषकांमार्फत निवड करणेत येईल.

१२. चाचणीसाठी निवडण्यात आलेल्या तुकडीतील ३० विद्यार्थी स्तरीय यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने (Random Sampling) सर्वेक्षणाच्या दिवशी क्षेत्रिय अन्वेषकांमार्फात निवडले जातील.

१३. निवडलेल्या वर्गात चाचणीसाठी ३० विद्यार्थी संख्येपेक्षा कमी विद्यार्थी असतील तर नमुना निवड करण्याची आवश्यकता नाही. सर्व विद्यार्थ्यांची चाचणीसाठी निवड करण्यात यावी.

१४. दिनांक १० ते १२ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत निवड केलेल्या शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक,पर्यवेक्षकीय यंत्रणेतील घटक, क्षेत्रीय अन्वेषक इत्यादीपैकी कोणीही अनुपस्थीत राहणार नाही अथवा मुख्यालय सोडणार नाही याबाबत सर्वाना अवगत करण्यात यावे.

१५. NAS २०२१ साठी निवड केलेल्या शाळांमध्ये जिल्हयातील/ शाळातील/ वर्गातील विद्यार्थी संख्या कमी होऊ नये म्हणून निवड केलेल्या वर्गाचे सर्व विद्यार्थी व शिक्षक दि.१२ नोव्हेंबर २०२१ रोजी १०० टक्के उपस्थित राहतील, याबाबत सक्त सूचना द्याव्यात. सर्वेक्षणा दिवशी विद्यार्थी सकाळी ८.०० वाजता उपस्थित असणे अपेक्षित आहे व सर्वेक्षणाचे काम साधारणतः २.०० वाजेपर्यंत चालण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांना सकाळी येताना घरून जेवणाचे डबे, पिण्याचे पाणी सोबत बाळगण्यास सांगावे.

१६. आवश्यक तेथे विद्यार्थ्यांच्या पालकांशी प्रत्यक्ष वा भ्रमणध्वनी वरून संपर्क करून विद्यार्थी उपस्थित ठेवण्याबाबत आवाहन करणेत यावे.

१७. दिनांक १० व ११ नोव्हेंबर २०२१ या दिवशी क्षेत्रीय अन्वेषक व निरीक्षक आपल्या शाळेला भेट देवून चाचणीसाठी आवश्यक ती पूर्वतयारी करणार आहेत. तरी त्यांना आवश्यक ती माहिती उपलब्ध करून द्यावी व

वेळोवेळी योग्य ते सहकार्य करावे.

१८. दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ७:३० वाजता शाळा सुरु करण्यात यावी. मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी सकाळी ७:३० पूर्वी शाळेत उपस्थित राहावे. सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आलेल्या शाळेत

क्षेत्रीय अन्वेषक व निरीक्षक सकाळी ७.३० वाजता उपस्थित राहून विद्यार्थी संपादणूक चाचणी (AT), विद्यार्थी प्रश्नावली (PQ), शिक्षक प्रश्नावली (TQ), शाळा प्रश्नावली (SQ), क्षेत्रीय टीपण (Field Note) इत्यादी बाबत योग्य ती कार्यवाही करतील. तरी त्यांना आवश्यक ते सहकार्य करणेत यावे. सर्वेक्षणाच्या दिवशी शाळेतील वातावरण आनंदी व उत्साही ठेवण्यासाठी योग्य असे नियोजन करावे.

१९. मुख्याध्यापकांनी शाळा प्रश्नावली (SQ) व शिक्षकांनी शिक्षक प्रश्नावली (TO) काळजीपूर्वक वाचून व समजून घेवून याचे प्रतिसाद दिलेल्या OMR शीटवर बिनचूक भरावेत.

२०. विद्यार्थ्यांनी सर्वेक्षणासाठी येताना काळ्या/निळ्या रंगाचे किमान २ बॉल पॉइट पेन सोबत ठेवावे तसेच शाळेनी सुद्धा काही प्रमाणात पेन शिल्लक ठेवावे.

२१. इयत्ता ३ री व ५ वी चे विद्यार्थ्यांसाठी संपादणूक सर्वेक्षण चाचणी सोडविण्याची प्रत्यक्ष वेळ सकाळी १०.३० ते १२.०० पर्यंत (एकूण ९० मि.) असेल तर इयत्ता ८ वी व १० वी चे विद्यार्थ्यांसाठी चाचणी सोडविण्याची प्रत्यक्ष वेळ सकाळी १०.३० ते १२.३० पर्यंत (एकूण १२० मि.) असेल.

२२. दुपारी १२.००/ १२.३० ला चाचणी सोडविल्यानंतर विद्यार्थ्यांना जेवण व इतर बाबींसाठी कमाल १० मिनिटे विश्रांती द्यावी. परंतु यावेळेत कोणताही विद्यार्थी शाळेच्या/प्रांगणाच्या बाहेर जाणार नाही याची काटेकोर दक्षता घ्यावी. व त्यानंतर विद्यार्थ्यांकडून विद्यार्थी प्रश्नावली (PQ) भरून घेण्यात यावी.

२३. दिव्यांग (CWSN)यांनी विद्यार्थ्यासाठी आवश्यकता भासल्यास शाळा मुख्याध्यापक यांनी क्षेत्रीय अन्वेषक आणि निरीक्षक यांच्याशी सल्लामसलत करून लेखनिक उपलब्ध करून द्यावा.

२४. इयत्ता ३ री च्या विद्यार्थ्यांना OMR पद्धतीची सवय नसल्याने त्यांचे सर्व OMR शीट हे क्षेत्रिय अन्वेषक भरून देतील.

२५. विद्यार्थी संपादणूक चाचणी (AT), विद्यार्थी प्रश्नावली (PQ), शिक्षक प्रश्नावली (TQ), शाळा प्रश्नावली (SQ) इ. प्रतिसाद OMR पद्धतीने नोंदविले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापक यांना याबाबत अवगत करणेत यावे.

२६. आपल्या शाळेतील निवड झालेल्या माध्यमनिहाय इयत्ता व संबंधित वर्गांना शिकविणारे सर्व विषय शिक्षक सर्वेक्षणादरम्यान १०० टक्के उपस्थित असणे अनिवार्य आहे.

२७. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी शाळांच्या पुर्वतयारीचा भाग म्हणून NAS २०२१ साठी निवडण्यात

आलेल्या सर्व शाळांनी खालील माहिती तयार करून ठेवावी.

१. सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळेने जी इयत्ता व माध्यम सर्वेक्षणासाठी निवडण्यात आलेली आहे, त्या

इयत्तेच्या व माध्यमाच्या सर्व तुकड्यातील विद्यार्थ्यांचे हजेरी पत्रकाचे दोन प्रतीत झेरॉक्स करून ठेवावे व

सदरचे झेरॉक्स क्षेत्रीय अन्वेषक यांना विद्यार्थी निवडीसाठी देण्यात यावे.

२. इयत्तानिहाय पट (मुले+ मुली) -

३.शाळा UDISE कोड

४. मुख्याध्यापक पूर्ण नाव व भ्रमणध्वनी५. कार्यरत शिक्षक भ्रमणध्वनीसह यादी६.शाळा माध्यम:७.शाळा व्यवस्थापन प्रकार

८.शाळा - ग्रामीण / शहरी:९. शाळेतील उपलब्ध भौतिक सुविधांची यादी:९. निवडलेल्या इयत्तेतील दारिद्र रेषेखालील विद्यार्थी यादी (BPL), अल्पसंख्याक विद्यार्थी यादी, CWSN विद्यार्थी यादी, जात संवर्ग निहाय यादी (SC/ST/OBC/OPENCategory) तसेच प्रत्येक विद्यार्थ्याच्या वयाची माहिती तयार करून ठेवावी.

२८. सर्व क्षेत्रीय अन्वेषकांना योग्य असे प्रशासकीय आदेश देण्यात यावेत, ज्यामुळे क्षेत्रीय अन्वेषक न चुकता सर्वेक्षणासाठी उपस्थित राहतील. कोणत्याही प्रकारे क्षेत्रीय अन्वेषकांना दिनांक १२/११/२०२१ रोजी सुट्टी/रजा वा कोणतीही सवलत देण्यात येवू नये. गैरहजर क्षेत्रीय अन्वेषकांवर योग्य ती प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करणेत यावी.

२९. सर्व क्षेत्रीय अन्वेषकांनी https://nas.education.gov.in या वेबसाईट वरील Capacity Building ची माहिती वव्हीडीओ पाहून घ्यावे. त्यासोबतच या वेबसाईट वरून Letter of Appointment (LOA) डाउनलोड करून त्याची प्रिंट व एक शासकीय ओळखपत्र सोबत ठेवावे.

३०. उपरोक्त संदर्भ क्र. ३ नुसार ज्या जिल्ह्यात निवडलेल्या व duty allocation झालेल्या क्षेत्रीय अन्वेषकांना अचानक काही अडचणी आल्यास ऐनवेळी त्यांच्या जागी नोंदणी झालेले परंतु duty allocation न झालेल्या (राखीव) क्षेत्रीय अन्वेषकांना जिल्हा नोडल अधिकारी (DNO) यांनी तात्पुरते आदेश आपल्या स्तरावर देवून

कार्यान्वित करावे, जेणे करून आपल्या जिल्ह्याचे कामकाज वस्तुनिष्ठ व दर्जेदार होईल.

३१. NAS २०२१ साठी निवडण्यात आलेल्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, क्षेत्रीय अन्वेषक (F.I.) व निरीक्षक

(Observer) यांनी जिल्हा नोडल अधिकारी (DNO) व जिल्हा स्तरीय समन्वयक (DLC) यांच्याकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे.

३२. सर्वेक्षण सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वेक्षाणाशी संबधित सर्व स्तरावरील घटकांनी पवित्रता, गांभीर्य आणि निष्पक्षता राखण्यात यावी. दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ रोजी आपणास NAS २०२१ अंमलबजावणी बाबत कोणतीही अडचण/समस्या उद्भवल्यास कृपया आपल्या जिल्ह्याच्या प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तथा जिल्हा नोडल अधिकारी, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांचेशी संपर्क साधण्यात यावा. आपल्या जिल्ह्यात दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ रोजी NAS २०२१ संपादणूक चाचणीचे यशस्वी आयोजनाची संयुक्त जबाबदारी संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तथा जिल्हा नोडल अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

यांची असेल, याची नोंद घ्यावी.

आपल्या सुलभ संदर्भासाठी परिशिष्ट अव बदेण्यात येत आहे.


(दिनकर टेमकर)

शिक्षण संचालक

प्राथमिक

(महेश पालकर)

शिक्षण संचालक

माध्यमिक व उच्च माध्यमिक

(एम. डी. सिंह)

संचालक,

रा.शै.सं.व प्र.परिषद

महाराष्ट्र, पुणे.



Post a Comment

1 Comments

Total Pageviews