विषय: " विषय : राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रास उपस्थित राहणेबाबत....
संदर्भ : मा.संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे यांचे पत्र जा.क्र. राशैसंप्रपम/ संशोधन / चर्चासत्र / २०२१-२२ /३१८३, दि.३०/०९ /२०२१
शासन निर्णयानुसार राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता ५ ते १२ वी व शहरी भागातील इयत्ता ८ वी ते १२ च्या शाळांचे वर्ग सुरक्षितपणे सुरु करण्यासाठी शासनाने अतिरिक्त मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार उपरोक्तप्रमाणे दि.४ ऑक्टोंबर २०२१ पासून शाळा सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.
या अनुषंगाने दि. *१ ऑक्टोंबर २०२१ रोजी सायं. ४.०० वा.* ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात मा.ना.प्रा.वर्षाताई गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. तसेच मा.वंदना कृष्णा, अप्पर मुख्य सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व टास्क फोर्समधील मान्यवर अधिकारीही या चर्चासत्रात मार्गदर्शन करणार आहेत.
तरी या चर्चा सत्रास सर्व क्षेत्रीय अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षक यांनी पुढील यु-ट्यूब लिंकद्वारे स्वतः उपस्थित राहावे.
2 Comments
Very nice vebinar
ReplyDelete
ReplyDeleteVery nice