कोरोना प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे १४ मार्च २०२० पासून महाराष्ट्रातील
शाळा बंद करण्यात आल्या. त्या अद्यापही उघडता आलेल्या नाहीत. तसेच घरोघरी दर्जेदार शिक्षणाचीआपत्कालीन पर्यायी व्यवस्था उभी राहिलेली नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे अपरिमित शैक्षणिक नुकसान होत
आहे. शाळा नियमितपणे कधी व कशा सुरू होऊ शकतील यासंबंधी अनिश्चितता असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा व महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थी शिक्षणासाठी महाराष्ट्र शासनामार्फत विविध माध्यमे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. यामध्येच डी.डी. सह्याद्री वाहिनीद्वारे 'ज्ञानगंगा” या शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रक्षेपण दिनांक १४ जून २०२१ पासून दैनिक ५ तासांकरीता सुरु करण्यात आले आले. शासनाच्या याच उपक्रमाला सहयोग देण्यासाठी,व अशा अपवादात्मक परिस्थितीत ‘एमकेसीएल नॉलेज फाऊन्डेशन' या स्वयंसेवी संस्थेने पहिली ते आठवी इयत्तांच्या पहिल्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण दूरदर्शनच्या ‘सह्याद्री वाहिनीवर दैनंदिन मालिकेद्वारे पुनर्प्रक्षेपण मोफत देण्याचे ठरविले आहे. मागील शैक्षणिक वर्षात “टिलीमिली” ही मालिका विद्यार्थ्यान मध्ये अत्यंत लोकप्रिय झाली. आपल्या राज्यात
सर्वदूर राहणाऱ्या सुमारे दीड कोटी ‘टिलींना व मिलींना' अर्थात मुलामुलींना त्यांच्या घरच्या, शेजारच्या किंवा परिसरातल्या दूरचित्रवाणी संचावर या नि:शुल्क सेवेचा लाभ घेतला तसा याही वर्षी घेता येईल. ही मालिका त्यांच्या पालकांनीही मुलांसोबत जरूर बघावी व त्यात सुचवलेले उपक्रम त्याच दिवशी मुलांबरोबर घरी व परिसरात करून शिकावे. “टिलीमिली” ही मालिका ‘बालभारती'च्या पहिली ते आठवी इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांतील पहिल्या सत्राच्या सर्व पाठांवर आधारित आहे. त्यात कुठेही मुलांना कंटाळा आणणारी सलग व्याख्याने नाहीत. मुलांना घरी व परिसरात करून बघता येतील अशा कृतीनिष्ठ उपक्रमातून शैक्षणिक अनुभव घेऊ दिले गेले आहेत, त्यांच्याभोवती छोट्याछोट्या आव्हानांचे सातत्य राखले जाईल, त्यांना ताण येऊ नये यासाठी स्वच्छ, मोकळे, आनंदी वातावरण व भावनिक सुरक्षितता असेल व चुका करत स्वत:ची अर्थबांधणी स्वत:च करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. असे केल्याने मुले हसत-खेळत स्वत:च कशी शिकतात हे मालिकेच्या प्रत्येक भागात बघायला मिळेल. अशी सहज,आनंददायक व ज्ञानरचनावादी प्रकिया उलगडत राहिल्याने मुलांना ही मालिका रोज स्वत: शिकण्याची स्फूर्ती देईल,त्यांचा आत्मविश्वास वाढवेल व शिकायचे कसे हे शिकवेल.
टीलीमिली कार्यक्रम पाहण्यासाठी खालील चित्रावर स्पर्श करा
0 Comments