Ticker

10/recent/ticker-posts

ते अमर हुतात्मे झाले इयत्ता तिसरी

 te Amar hutatme zale iyatta tisri ते अमर हुतात्मे झाले!


ते देशासाठी लढले
ते अमर हुतात्मे झाले ! ।। धृ.।।
सोडिले सर्व घरदार
त्यागिला सुखी संसार
ज्योतीसम जीवन जगले
ते देशासाठी लढले ! ।।१।।
तो तुरुंग, ते उपवास
सोसला किती वनवास
कुणि फासावरती चढले
ते देशासाठी लढले ! ।। २।।
झगडली, झुंजली जनता
मग स्वतंत्र झाली 'माता'
हिमशिखरी ध्वज फडफडले
ते देशासाठी लढले ! ।। ३।।
हा राष्ट्रध्वज साक्षीला
करु आपण वंदन याला
जयगीत गाउया अपुले
ते देशासाठी लढले ! ।। ४।।

- वि. म. कुलकर्णी








Post a Comment

0 Comments

Total Pageviews