kal in marathi | मराठी व्याकरण |काळ व काळाचे प्रकार |Tenses in Marathi। Learning With Smartness
वाक्यप्रक्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा जो बोध होतो त्यास काळ असे म्हणतात.
मुख्य काळ तीन आहेत.
वर्तमान काळ
भूतकाळ
भविष्यकाळ
काळाचे उपप्रकार किंवा पोट प्रकार
वर्तमानकाळ
प्रकार | वर्तमान काळ |
साधा | मी गोष्ट वाचतो. |
अपूर्ण | मी गोष्ट वाचत आहे. |
पूर्ण | मी गोष्ट वाचली आहे. |
रीती | मी गोष्ट वाचत असतो. |
प्रकार | भूतकाळ |
साधा | मी गोष्ट वाचली. |
अपूर्ण | मी गोष्ट वाचत होतो. |
पूर्ण | मी गोष्ट वाचली होती. |
रीती | मी गोष्ट वाचत असे. |
प्रकार | भविष्यकाळ |
साधा | मी गोष्ट वाचेल. |
अपूर्ण | मी गोष्ट वाचत असेन. |
पूर्ण | मी गोष्ट वाचली असेन. |
रीती | मी गोष्ट वाचत जाईन. |
0 Comments