स्कॉलरशिप परीक्षा ,पाचवी व आठवी दि.०८ ऑगस्ट,२०२१ रोजी होणार
विषय:- सन २०२०-२१ च्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५वी) व पूर्माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.८वी) आयोजनाबाबत. संदर्भ:- १) शासन निर्णय क्र. एफईडी-४०१४/६४३/प्र.क्र.०४ एसडी-५.दि.१५ नोव्हेंबर, २०१६ २) शासनाची समक्रमांकाची दि. ११ सप्टेंबर, २०२० व दि.३० मार्च, २०२१ रोजीची पत्रे. ३) आयुक्त तथा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे पत्र,जा.क्र.मरापप/शिष्यवृत्ती/२०२१/२०४५. दि.०९.०७.२०२१ संदर्भ क्र.२ येथील दि.११ सप्टेंबर, २०२० च्या पत्रान्वये, सन २०२०-२१ च्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.५वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ.८वी) या परीक्षा फेब्रुवारीच्या दुसऱ्या तिसऱ्या रविवार ऐवजी एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या रविवारी घेण्याच्या आपल्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होती. तथापि, कोविडच्या प्रादुर्भावामुळे परीक्षा होऊ न शकल्याने दि.३० मार्च, २०२१ रोजीच्या पत्रान्वये, दि.२३.०५.२०२१ रोजी सदर परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात आली होती. तथापि, पुन्हा कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे आणि तांत्रिक कारणास्तव सदर परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. २.कोरोना नियमांचे पालन करण्याच्या अटीच्या अधीन राहून, सदर परीक्षा दि.०८ ऑगस्ट,२०२१ रोजी आयोजित करण्यास याव्दारे मान्यता देण्यात येत आहे. (राजेंद्र पवार) सह सचिव, महाराष्ट्र शासन प्रत:- १) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे २) शिक्षण संचालक (प्राथमिक), महाराष्ट्र राज्य,पुणे ३) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य,पुणे
0 Comments