Ticker

10/recent/ticker-posts

The Maharashtra State Biodiversity Board - STATE LEVEL ONLINE COMPETITION

महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन 

राज्य स्तरीय ऑनलाईन निबंध स्पर्धा | चित्रकला स्पर्धा | छायाचित्र स्पर्धा 



विषय : दि. २२ मे २०२१ रोजी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस साजरा करण्याच्या दृष्टीने विविध स्पर्धेच्या आयोजनाबाबत.
दरवर्षी २२ मे हा "आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस" म्हणुन साजरा करण्यात येतो. यावर्षीची मध्यवर्ती संकल्पना (Theme) "आम्ही निसर्गाच्या समाधानाचे भाग आहोत" ("We're part of solution for nature") ही जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन तसेच जैवविविधतेची माहिती जन माणसात व्हावी. यादृष्टीने महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाने सहपत्रीत पत्राप्रमाणे विविध स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. तरी विद्यार्थी पालक शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था यांनी या स्पर्धेत जास्तीत जास्त सहभागी व्हावे.
स्पर्धकांसाठी अटी व शर्ती :
१. स्पर्धेक हा भारतीय असावा. विषय महाराष्ट्र जैवविविधता संवर्धनाशी निगडीत असावा.
२. निबंध स्पर्धेतील शब्दाची मर्यादा पदवीधर व पदव्युत्तर, पीएचडी धारकांकरिता ८०० ते १००० शब्द राहील.
1) निबंध तपासतांना विषयाचे ज्ञान, विश्लेषण, मांजणी, शुध्दलेखन, व हस्ताक्षर विचारात घेण्यात येईल.निबंधांना ५ सेंमी मार्जिन असावी.
ii) चित्रकला / पोस्टर स्पर्धेकरिता चित्राचा आकार ३३x५० किंवा ५० x ७० सें.मी. राहील.
चित्रकला / पोस्टरचे स्कॅन करुन पीडीएफ फाईल तयार करावी व दिलेल्या ईमेल आयडी वर पाठवावे.
3. चित्रासाठी कोणतेही माध्यम वापरले तरी चालेल. हार्ड कॉपी स्विकारल्या जाणार नाही. नाविन्यपुर्ण बाबींना प्राधान्य दिले जाईल.
4. व्यावसायिक आयाचित्रकाराला या स्पर्धेत भाग घेता येणार नाही. फक्त विद्यार्थी, पालक, शिक्षक,नागरीक यांनाच सहभाग घेता येईल.
5. वनविभाग व वनविभागातील संलग्न विभागातील ( वनविकास महामंडळ / वन्यजीव | सामाजिक वनीकरण मंडळ इ.) कर्मचारी | अधिकारी यांना या स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
6. व्हिडीओ क्लिप्स मूल संकल्पनेशी संबंधित असावे,
7. स्पर्धा व पारितोषिक संबंधी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचा निर्णय अंतीम राहील. एकदा निकाल घोषित झाल्यानंतर त्याबाबत तक्रार स्विकारले जाणार नाही.
8. २ सदस्य चमुकहुन प्रवेशिकेचे तपासणी करण्यात येईल.
1) प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ - 1
ii) प्राध्यापक / अध्यापक महाविद्यालयीन प्रतिनिधी - 1
ii) वनविभाग | सामाजिक वनीकरण विभाग / शासकीय अधिकारी-1
9. स्पर्धकाने ऑनलाईन प्रविशिकेच्या वेळी स्व:हस्ताक्षरात सहमती पत्र देऊन त्यामध्ये सविस्तर नाव पत्ता जन्म तारिख । ई-मेल / दुरध्वनी क्रमांक / आधारकार्ड व शैक्षणिक संस्थेचे नाव अंतर्भुत
करावे.
10. स्पर्धकाने खालील प्रपत्रात स्व: हस्ताक्षरात माहिती भरावी किंवा टंकलेखीत करावे व ऑनलाईन प्रविशिकेच्या वेळी सादर करावी.
1. नाव:2. लिंग:3. जन्मतारिख:4. रहिवासी पता :
5. शाळा / महाविद्यालय / विद्यापीठ / संस्थेचे नाव :6. आधारकार्ड नं :7. फोन क्र.
8. ईमेल नं :9. सही केलेले छायाचित्रे :11. स्पर्धेचा निकाल जुन 2021 च्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट
www.mahaforest.gov.in वर घोषित करण्यात येईल व विजेत्यांना दिलेल्या ईमेल वर माहिती
पाठविण्यात येईल.
(प्रवीण श्रीवास्तव)
प्रधान मुख्य वनसंरक्षक
तथा सदस्य सचिव
महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ








Post a Comment

1 Comments

Total Pageviews